भाजपशासित राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे का उतरवत नाहीत- प्रवीण तोगडीया

Update: 2022-04-19 09:42 GMT

नागपूर : भोंग्यांवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना आव्हान दिले आहे, त्यांच्या या भूमिकेला राज्यातील भाजपचे नेते पाठिंबा देत आहेत. पण भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपची सरकार असलेल्या राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवावे, असा टोला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे, ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“महाराष्ट्रात भाजपचे सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच; परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत. रात्री १० ते सूर्योदयापर्यत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे”, उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती.” असेही तोगडिया यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर “ई-श्रमकार्ड’धारकांच्या बँक खात्यात दरमहा सहा हजार रूपये जमा करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Full View
Tags:    

Similar News