ठाकरे सरकारमधील मंत्री पत्रकारांना का घाबरतायत...

Update: 2021-10-08 16:31 GMT

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) पत्रकारांना घाबरतात म्हणून ते पत्रकार परिषद घेत नसल्याचे आरोप अनेकदा होतात. मात्र आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सुद्धा आता पत्रकारांची भीती वाटायला लागली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण औरंगाबादमध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रम किंवा मंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना बसण्याची परवानगी दिली जात नाही.

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) वैजापूर येथील समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी आले असता कार्यक्रमात पत्रकारांना परवानगी नाकरण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अनेक दौऱ्यात सुद्धा हाच अनुभव पत्रकारांना आला. त्यानंतर 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात अनेक माध्यमांना परवानगी दिली गेली नाही.

त्यातच आता शुक्रवारी जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई ( subhash desai )यांच्या उपस्थितीत पार पडली,मात्र यावेळी सुद्धा पत्रकारांना बैठकीत बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी आशा बैठकीत पत्रकारांना कधीच रोखण्यात आले नव्हते. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना पत्रकारांचा एवढा राग का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News