ब्रिजभुषण सिंह यांना रसद नेमकी कोणाची?

राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा रद्द केल्यानंतर पुण्यात जाहीर सभेत काही आरोप केले होते. तर राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्रातून ब्रिजभुषण सिंह यांना रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र मनसेने एक फोटो ट्वीट केल्याने राज ठाकरे यांचा निशाणा नेमका कुणावर हे स्पष्ट झाले आहे.

Update: 2022-05-24 05:01 GMT

राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा रद्द का केला? याची कारणे पुण्यात झालेल्या जाहीर सभेत सांगितले. त्यावेळी ब्रिजभुषण सिंह यांना राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला. त्यामुळे ब्रिजभुषण सिंह यांना महाराष्ट्रातून नेमकी कोणी रसद पुरवली? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यापार्श्वभुमीवर मनसेने फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांचे सचिव सचिन मारुती मोरे यांनी भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांचा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो शेअर केले आहेत. तर त्यावर कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है, असे म्हटले आहे. त्यामुळे खासदार ब्रिजभुषण सिंह यांना शरद पवार यांनी रसद पुरवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Full View

राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना खासदार ब्रिजभुषण सिंह यांना मला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आले होते. तर मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही राज ठाकरेंविरोधात रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात भाजप सरकार आहे. तसेच राज ठाकरे यांना विरोध करणारा खासदारही भाजपचा आहे. त्यामुळे त्यांना भाजपने रसद पुरवली आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही राज ठाकरे यांच्या वक्तव्याची री ओढत भाजपनेच ब्रिजभुषण सिंह यांना रसद पुरवल्याचा आरोप केला होता. मात्र अखेर मनसेने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्वीट केल्याने राज ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीने रसद पुरवली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News