अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर संजय राऊत काय म्हणाले? वाचा

Update: 2024-03-23 07:14 GMT

अरविंद केजरीवाल यांना अतिशय बेकायदेशीरपणे, भितीच्या पोटी आणि बदलाच्या भावनेने खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे, हे संपूर्ण देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यामांशी बोलताना दिली.

देशात कुणीच सुरक्षित नाही -

दरम्यान, भाजपविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आमच्यासोबत राहिले तर भाजपच्या मनात भिती आहे की दिवसेंदिवस लोकसभा निवडणूकांचा प्रवास हा कठीण होत चालला आहे. म्हणून त्यांना आणि त्यांच्या सर्व साथीदारांना, हेमंत शौर्य यांसह इतर अनेक नेते यांचा जो त्रास देण्याचा देण्याचा कार्यक्रम चालू आहे तो तसाच चालत रहावा.

दरम्यान आज कोणताही व्यक्ती या देशात सुरक्षित नाही, कुणालाही अटक होऊ शकते, कायदा नाही, जंगलराज चालू आहे, ज्याप्रमाणे रसियामध्ये, आणि कोरियाची परिस्थिती आहे तशीच स्थिती सध्या देशात आहे, असं राऊत म्हणाले.

जर केजरीवाल यांना खोट्या केसमध्ये फसवलं जात असेल, केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून त्यांची पार्टी तोडण्याचा कट रचला जात असेल किंवा त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर केजरीवाल यांच्याकडे सगळं बहुमत आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता भाजपासोबत लढण्याची हिंमत ठेवावी. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News