हम उसे जिंदा नही छोडेंगे ; मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या...

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Update: 2023-03-28 04:49 GMT

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. मुंब्रा शहरातील बेकायदा मशीद आणि दर्ग्यांवर कारवाई केली जाईल अन्यथा पुढे हनुमान मंदिर उभारले जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेने आपले प्रमुख अविनाश जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात अनधिकृत मशिदी, दर्गे आणि दर्ग्यांच्या बांधकामाबाबत सरकारला इशारा दिला. त्यामुळे माहीम आणि सांगली येथील मझार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही सुरु केली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा टेकडीवर वनविभागाच्या ताब्यातील मालमत्तेवरील बेकायदा दर्गा उघड केला. या प्रकरणी जाधव यांनी प्रशासनाला 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने तात्काळ संबंधित ठिकाणची पाहणी केली होती.

 हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे

मुंब्रा डोंगराची पाहणी करून त्यांची चौकशी सुरू असताना काही मुस्लिम धर्मांधांनी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या विरोधात एकजूट होण्यास सुरू केले आहे. असा दावा मनसेने केला आहे. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना धमकी दिली. " हम उसे जिंदा नही छोडेंगे ... कोई गुस्ताख छुप न पाएगा ... हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे ... " मनसेने , एस आर कमिटी ... बॉयकॉट अविनाश जाधव, असे म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

नारायणेश्वर आणि पुणेेश्वर मंदिराचा वाद तापणार का ?

पुणेेश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. मनसेच्या मागणीनुसार मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य प्रशासनाने या प्रत्येक ठिकाणचे काम तातडीने सुरू केले पाहिजे. नारायणेश्वर आणि पुणेेश्वर मंदिरांसाठी मनसे आधीच लढत आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी जुने अवशेष आणि हिंदू मंदिराच्या खुणाही आहेत.

Tags:    

Similar News