असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचं ट्विटर अकाउंट हॅक

Update: 2021-07-18 14:52 GMT

असदुद्दीन ओवैसी यांच्या "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" (AIMIM) पक्षाचं व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट रविवारी हॅक झालं आहे. दरम्यान हॅकरने अकाउंटच नाव बदलून पक्षाच्या नावाऐवजी एलोन मस्क असं केलं आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फोटो काढून एलोन मस्क यांचा फोटो लावला आहे.

एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्यांचे मालक आहेत.

दरम्यान हैद्राबादमधील पक्षाच्या प्रवक्त्याने या संदर्भात निवेदन दिलं आहे. या अगोदर ९ दिवसांपूर्वी सुद्धा अकाउंट हॅक करण्यात आलं होतं. मात्र, ते काही काळानंतर पुन्हा रिस्टोअर करण्यात आलं. पण अकाउंट पुन्हा हॅक झाल्याने पक्षाने यासंदर्भात सोमवारी तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

हॅक झालेल्या अकाउंट वरून अद्याप पर्यंत कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही. दरम्यान AIMIM पक्षाच्या हॅक झालेल्या अकाउंटचे ६ लाख ७८ हजाराहून अधिक फॉलोअर्स असल्याचं आहेत.

सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीत AIMIM पक्षाची भूमिका महत्त्वाची समजली जात आहे. असुद्दीन ओवैसी टीका करताना जरी मोदी वर करत असतील तरीही AIMIM चा फटका समाजवादी पक्षाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

Tags:    

Similar News