तुमच्या अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता, हा खरा देशापुढचा प्रश्न आहे - शरद पवार

Update: 2024-03-24 11:30 GMT

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व इंडिया आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालूक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आपल्या भाषणात इंदापूरकरांना संबोधित करताना म्हणाले की, इंदापूर तालू्का हा शांत विचाराने एकत्रितपणे समाजकारण करणारा तालूका आहे. साधारणपणे ५६ वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत गेलो, त्याच्या अगोदर १० वर्षांपूर्वी १९५२ सालापासून शंकरराव पाटील इंदापूरमधून निवडून यायचे. सत्ता कधीही डोक्यात जाऊ द्यायची नाही, ही गोष्ट इंदापूरकरांनी शिकवली. शंकरराव पाटील यांनी राजकारण केले पण ते कधीही हवेत राहीले नाहीत. त्याचबरोबर आपल्यात असलेली नम्रता त्यांनी कधीही सोडली नाही, त्यांचा राजकारणातला अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होता. त्यामूळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांची आठवण येते.

दरम्यान, शरद पवार म्हणाले की, भाजपचा राज्यमंत्री असणाऱ्या खासदाराने गेल्या तीन वर्षांपूर्वी आम्हाला घटना बदलायची आहे असं विधान करत, पंतप्रधानांच्या मागे बहुमताने उभा रहावे, असं आव्हान मतदारांना केलं होतं. लोकशाहीत सत्ता मिळवणं, ती लोकांसाठी वापरणे, यामध्ये काही चूकीचं नाही. देशाच्या पंतप्रधानांना लोकांसाठी राज्य करायला, त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्यावे, अशी भूमिका आपण समजू शकतो.

परंतु सत्तेचा वापर करून ज्या घटनेच्य माध्यमातून डॉ. बाबासाहेब यांनी सर्वांना मुलभूत अधिकार दिले. तिच घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. तुमच्या अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता हाच खरा देशापुढं असलेला धोका आहे. तो टाळण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे, असे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या धोरणांच्या विरोधात जो कुणी जाईल, त्यांना तुरूंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकार सत्तेचा व दडपशाहीचा वापर करत आहे खासदार संजय राऊत, माझी गृहमंत्री अनिल देशमुख, ममता बॅनर्जी यांचे नेते, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आपचे मंत्री आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात टाकण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News