धैर्यशील मोहितेंचा भाजपला रामराम...लवकरच शरद पवार गटात जाण्याची तयारी

Update: 2024-04-12 08:46 GMT

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आला आहे. अशातच भापजला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना माढा लोकसभेतून उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज असून वेगळा मार्ग निवडतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान धैर्यशील पाटील यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. मोहिते पाटलांनी हा मार्ग निवडल्यामुळे ते आता रणजीतसिंह निंबाळकरांविरोधात लवकरच तुतारी फुंकणार हे जवळपास ठरल्याचं मानलं जात आहे.

राजीनाम्यावर काय म्हणाले धैर्यशील पाटील ?

यावेळी बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टी (BJP) सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. तसेच माळशिरस विधनासभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी माझ्याकडे, या कार्यकाळात जिल्हा मंडळ, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनांची रचाना गठीत करून कार्यान्वीत करण्याचं कार्य केलं. त्याचबरोबर शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रीय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. असं धैर्यशील पाटील म्हणाले.

पक्षाने दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वैयक्तिक कारणात्सव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा जाहीरनामा देत आहे, त्यांचा स्वीकार करावा, अशी विनंती. या आशयाचे राजीनामा पत्र त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले.

माढा लोकसभेवरून शरद पवारांची राजकीय वर्तुळात चर्चा

लोकसभेची महाराष्ट्रातली पहिली यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली त्यावेळी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. निंबाळकरांना देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील आपसुकच नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आणि शरद पवारांनी माढ्या भाकरी फिरवली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. येत्या १३ एप्रिल रोजी धैर्यशील पाटील हे आकलुजमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्टवादी शरद पवार गटात प्रवेश करतील पवारांकडून त्यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर होईल, हे आता निश्चित झाल्याचे मानलं जात आहे.

Similar News