रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी, म्हणाले...

Update: 2021-07-25 16:09 GMT

मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यात मोठं नुकसान झालं आहे. महाड, तळीये येथील दरड कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखालून 49 मृतदेह काढण्यात आले आहे. तर अद्यापही साधारण 33 मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. गावात 1 च घर शिल्लक राहिले असून सर्वांचे संसार, आयुष्य उध्वस्त झाले आहेत.

आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकसानग्रस्त तळीये भेट दिली.

महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त भागाला आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. तसेच या भागाची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून त्यांनी घटनेचा आढावा देखील घेतला.

यावेळी आठवले म्हणाले…

येथे असलेल्या 30 ते 35 घरांपैकी गावात एकच घर राहील आहे. येथील घर चांगली होती मात्र, सर्वांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तेव्हा महाराष्ट्र सरकारने महाड व परिसरातील अशा दरडप्रवण व डोंगर दऱ्यांच्या मध्ये, पायथ्याशी असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करावे. त्यासाठी एखादी अभ्यास समिती नेमावी व अशा गावांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावे अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे व केंद्र शासनाकडे पत्र देऊन करणार असल्याचे सांगितले.

Tags:    

Similar News