राज्य मंञीमंडळाची आज बैठक ; काय होणार चर्चा याकडे राज्याचं लक्ष

Update: 2024-02-05 03:55 GMT

मुंबई : आज सकाळी १० वाजता राज्य मंञीमंडळाची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. मराठा आरक्षण आध्यादेशानंतर ही राज्य मंञीमंडळाची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीत मंञी छगन भुजबळ आता आक्रमण भूमिका घेण्याची सुध्दा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची ही बैठक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यामध्ये सुध्दा महायुतीचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्यामुळे मंञी मंडळ बैठक रद्द करण्यात आली होती. आजच्या या बैठकीकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान मराठा आरक्षणावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, आणि या बैठकीत मंञी छगन भूजबळ आक्रमक भूमिका घेतील अशी शक्यता आहे. राज्यात सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आहे याकडे माञ सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

Tags:    

Similar News