शिवाजी महाराजांचा अपमान करणारे ऍमेझॉनच्या पार्सलने माघारी :उध्दव ठाकरेंचा कोश्यारींवर टिका.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव मध्ये उत्तर भारतीयांशी संवाद साधला , यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,यांच्यावर निशाणा साधत अप्रत्यक्षपणे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे .

Update: 2023-02-12 16:19 GMT

महाविकास आघाडी स्थापन केली, तर हिंदुत्व सोडलं म्हणतात. आता, तुमच्याशी संवाद साधला तर, बोलणार उत्तर भारतीयांच्या मागे लागले, असं उद्धव ठाकरें या कार्यक्रामध्ये बोलतांना म्हणाले आहेत .“अलीकडे पंतप्रधान मोदींनी बोहरा मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमाला भेट दिली. तेथील किचनमध्ये मोदींजींनी पोळी भाजली. हेच मी केलं असतं, तर हिंदुत्व सोडलं बोलले असते. त्यांचं मन मोठं आणि आमचं… त्यामुळे बघण्याची पद्धत बदलली पाहिजे. असही उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले.आम्ही असं केलं तर गुन्हा केला का असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळेस विचारला .

Full View

कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी अप्रतेक्षपने एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे .“काँग्रेसबरोबर जाण्यासाठी मला मजबूर करण्यात आलं. आमच्यातील काही लोकं गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत. हे आमचं हिंदुत्व नाही. गळ्यात कोणाचा तरी पट्टा बांधून गुलामगिरी करणं, शिवसेना प्रमुखांनी शिकवलं नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे .

ते पुढे म्हणाले, ताकाला जाऊन भांडे आम्ही लपवत नाही. आमच्यातले काही गळ्यात पट्टा घालून त्यांच्या मागे गेले. मला बाळासाहेबांनी कुणाची गुलामी करायला नाही शिकवले. मोदीजी परवा आपल्या पोळ्या भाजून गेले. हेच मी केले असते तर? मी बोहरा समाजाच्या विरोधात नाही. त्यांनी केले तर सगळ माफ आम्ही केले तर गुन्हा. तो चष्मा आता बदलायला हवा. सगळ्यांसाठी आमच्या मनात चांगल्याच भावना. सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे. दोन वेळा शिवसैनिक रस्त्यावर उतरला १९९२-९३ आणि मी मुख्यमंत्री असतांना कोरोना काळात. मी कधीच मराठी अमराठी, हिंदू मुस्लमान असा भेदभाव केला नाही. आपण पाच वर्ष एकत्र असतो, शाखेत येतात पण निवडणुकीत का वेगळे होतो? ही भाजपची इंग्रज नीती. ह्यांना फक्त सत्तेच्या घोड्यावर बसायचे इतरांनी भांडायचे. मी डोळे उघडायला आलोय द्वेष वाढवायला आलोय. असाच कारभार सुरु राहिला तर हिंदुत्व धोक्यात. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा माझ्या वडिलांनी दिली. २०१८ साली मी रामलल्लाच्या दर्शनाला गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. शरयू मातेची आरती केली. कुणी मान्य करो अथवा नाही पण त्यानंतर राम मंदिरावर न्यायालयाचा निकाल आला. मी मुख्यमंत्री पण झालो.

भाजपाला खुले आव्हान देत उध्दव ठाकरे म्हणाले, आताही भाजपची निवडणुक घेण्याची हिंमत होत नाहीए. हिंमत नाही आणि हिंदूंचे नेतृत्व करतायत अस यांचे म्हणणे. हिंदू असा लेचापेचा नाही घ्या निवडणुका मी आज पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपण भेदभावाच्या भिंती उभारल्या तर आपले स्वातंत्र्य धोक्यात. आपले ऐक्य हीच आपली शक्ती. म्हणूनच आपल्याला एकत्रित राहावे लागेल. मधल्या काळात काही गैरसमज निर्माण झाला होता तो आज दूर करुन हातात हात घालून आपण पुढे जाऊ .

राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दिलेल्या बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले “आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनच्या पार्सलने माघारी जात आहे,” असा खोचक टोला राज्यपालांना लगावला आहे . 

Tags:    

Similar News