#Farmerprotest – फक्त ४ लोक देश चालवत आहेत, हम दो हमारे दो – राहुल गांधी

Update: 2021-02-11 13:45 GMT

केंद्रातील सरकार फक्त ४ लोक चालवत आहेत, हम दो और हमारे दो या धोऱणाचा वापर करत शेतकऱ्यांना देशाधडीला लावण्याचा कट रचत आहे असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला.

मोदी आणि अमित शाहांनी दोन उद्योगपतींसाठी हे कृषी कायदे आणल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांनी सभागृहात जोरदार टीका केली. या दोन उद्योगपतींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी आणली. गरिबांचा पैसा नोटबंदीच्या नावाखाली बँकांमध्ये गोळा केला गेला आणि तोच उद्योगपतींना देण्यात आला असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नवीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून बाजार समितीच्या संपवण्याचा डाव आहे, तसेच अन्न धान्य साठ्यावरील मर्यादा काढून एका उद्योगपतीचा फायदा करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव असून देशाचा कणाच मोडून काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Tags:    

Similar News