महायुतीच्या महादेव जानकर यांच्या सभेत कार्यकर्त्यांमध्ये राडा

Update: 2024-04-16 11:02 GMT

जालना (प्रतिनिधी /अजय गाढे) : 

जालना जिल्हातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे जानकर यांची प्रचार सभा आयोजित केली गेली होती. यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा कार्यकर्ता मेळावा चालू असताना अचानक स्टेजवर कार्यकत्यांमध्ये आपसात राडा पहायला मिळाला.

आपसात झालेल्या या राड्यामुळे महायुतीमध्ये गटबाज्या असल्याचे स्पष्ट दिसून आले, तर यावेळी काही काळ कार्यकत्यांमध्ये तणाव पहायला मिळाला.

यावेळी स्टेजवर भाजपचे नेते सतीश गाडगे देखील या सभेमध्ये उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले होते.तर महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये आपसात नाराजीचे सूर यावेळी पाहायला मिळाले महायुतीमध्ये नेत्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आपसातील वाद चव्हाट्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर हा वाद आ.बबनराव लोणीकर यांच्या मध्यस्थितीनंतर निवळला असला तरी मात्र आपसातील वादामुळे गटबाज्या मात्र चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.




 


Tags:    

Similar News