भीम आर्मीचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात भीम आर्मीने मोर्चा काढला असून सक्तीची वसुली थांबवून टप्प्याने विजबिल भरणा करण्याची मागणी केली आहे.

Update: 2021-06-25 14:32 GMT

गेल्या दीड वर्षापासून कोरोना या महामारीने देशावर आणि एकूणच महाराष्ट्र राज्याला पूर्णपणे कवेत घेतले आणि यामुळे अनेक लोकांच्या हाताचे रोजगार गेले तर काही लोकांनी रोजगार नसल्याने आत्महत्या केले. अश्यातच या कालावधीत महावितरण कंपनीचा महराष्ट्रातील नागरिकांचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणावर होता आणि आता तो बॅकलॉग हळूहळू कमी होत आहे आणि नागरिक वीज देयक भरू लागले आहेत. अनेक राजकीय पुढाकारयांनी विज बिल माफ होईल यासंदर्भात आश्वासन दिले मात्र ते झाले नाही आणि नागरिकांना ही समस होती की हे बिल कमी होणार किंवा रद्द होणार आणि ते झाले नाही त्यामुळे नागरिकांना आता महावितरण कार्यालय कडून हे बिल भरण्यासाठी टप्पेवारी करुन देण्यात आलेली होती.

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यात अनेक गोरगरीब नागरिक राहतात अशातच त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे वीज बिल अनेक महिन्यांपासून थकबाकी राहिले असून सदर एरिया चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हे नागरिकांना अपशब्द बोलून हे वीज बिल भरण्यासाठी लावायचे आणि गोरगरीबांकडे पैसे नसल्याने ते वीज बिल भरू शकत नसल्याने त्यांच्या घरची लाईन कापण्यात आले आणि बरेच दिवसांपासून लोक अंधारात राहत आहेत.

गोरगरिबांची परिस्थिती लक्षात घेता भीम आर्मी चे कार्यकर्ते अंकुश कोचे विदर्भ मुख्य महासचिव भीम आर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा महावितरण कार्यालयाला तक्रारी देण्यात आल्या मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज पुलगाव शहरात धडक मोर्चा महावितरण कार्यालयावर भीम आर्मी तर्फे काढण्यात आला.

या मोर्चा काढण्यात मागचे दोन महत्त्वाचे उद्देश :

१) एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर गजभिये यांची बदली करण्याची मागणी

२) विज बिल हप्ते पाडून देण्यात यावी

या मोर्चात वर्धा जिल्हा भीम आर्मी चे अध्यक्ष आशिष सोनटक्के आणि इतर भीम आर्मी चे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Tags:    

Similar News