देवेंद्र फडणवीस जनतेशी खोटं बोलले: सचिन सावंत यांचा भाजपवर पलटवार

फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्याचं राजकारण खदखदत असताना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपवर पुन्हा एकदा पलटवार करत देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचा आरोप केला आहे.

Update: 2021-03-25 17:35 GMT

रश्मी शुक्ला यांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता. मुख्य सचिवांच्या अहवालात सत्य समोर आले. फडणवीस साहेब असत्य बोलले. देशभरात महाराष्ट्राची बदनामी केली. केंद्रीय गृह सचिवांना असत्य माहिती दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुख्य सचिव यांच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांनी अनधिकृत रित्या केलेल्या फोन टॅपिंग च्या रिपोर्ट बरोबर कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता असे समजते. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस जनतेशी खोटं बोलले. गोपनीय अहवाल कसा मिळाला ते सांगितले नाही. CDR कोणी दिला व कसा मिळाला सांगितले नाही.हे सर्व गुन्ह्यात मोडते!

भाजपा किती बेजबाबदार व सत्तेसाठी हपापलेला पक्ष आहे हे स्पष्ट दिसत आहे. सत्तेसाठी धादांत खोटे बोलण्याची व कोणत्याही स्तरावर जाण्याची तयारी त्यांची आहे. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत होत्या हे स्पष्ट आहे, असं सावंत यांनी म्हटले आहे.

Full View


Tags:    

Similar News