बारामतीत आज होणार नमो महारोजगार मेळावा; शिंदे, फडणवीस यांसह शदर पवारही उपस्थित राहणार

Update: 2024-03-02 05:10 GMT

Baramati News Update : बारामतीत आज विद्याप्रतिष्ठानच्या आवारात, नमो महारोजगार मेळावा होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर शरद पवार देखील या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकाच मंचावर दिसणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यानंतर पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

बारामतीत होणाऱ्या या नमो महारोजगार मेळाव्याचे २ आणि ३ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली असून या माध्यमातून अजित पवार हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. जवळपास ४३ हजार युवक-युवतींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला होता. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नावे कार्यक्रम पत्रिकेवरून वगळ्यात आले होते. त्यानंतर शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या निवासस्थानी जेवणासाठी पत्र पाठवून आमंत्रित केले होते, मात्र व्यस्त असल्याचे कारण सांगत दोघांनीही या निमंत्रणाला नकार दिला. दरम्यान प्रशासनाने सावरासावर शरद पवार यांना देखील या मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले आहे, असं सांगण्यात आले असल्याने ते देखील या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

Tags:    

Similar News