मोदी काही न करता येतील श्रेय घ्यायला पुढे : सुब्रमन्यम स्वामी

Update: 2024-01-23 14:13 GMT


सोमवारी आयोध्येत राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा संपन्न होऊन राममंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावरुन भाजपचे नेते व माजी खाजदार सुब्रमन्यम स्वामींनी पंतप्रधान मोदींवर टिका केली आहे.

सुब्रमन्यम स्वामी हे काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी या मंदिरांप्रकरणी लवकरच सुप्रिम कोर्टात एक याचिका दाखल करणार आहेत असं म्हणाले यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिर पुन्हा बांधण्याची परवानगी मिळावी यासाठी माझी प्लेस ऑफ वर्शिप ही जनहित याचिका सुप्रीम कोर्टात लवकरच दाखल करणार आहे. ही याचिका लवकरात लवकर पटलावर घ्यावी यासाठी मी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. त्यासाठी मोदी आता काहीच करणार नाहीत परंतु नंतर श्रेय घेण्यासाठी धावत येतील. अशी टिका स्वामी यांनी पंतप्रधान मोदीवर केली आहे.

Tags:    

Similar News