"शिवसेना भवनात आरतीसाठी परवानगी द्या" मनसे विरुद्ध शिवसेना संघर्ष

Update: 2022-04-12 11:58 GMT

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत मशिदींपुढे हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूंमीवर आता मनसेने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेवर टीका करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी मनसेने थेट शिवसेना भवनात आरतीसाठी परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी हे पत्र पाठवले आहे. पण महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मागणीला उत्तर दिले आहे. शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करु नका आणि महाराष्ट्र तसेच मुंबई अस्थिर करु नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Full View
Tags:    

Similar News