Solapur Loksabha साठी आ. Praniti Shinde यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

Update: 2024-04-18 09:36 GMT

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यकडे अर्ज दाखल केला.

सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते वाजत गाजत दाखल झाले होते. यावेळी याठिकाणी प्रमुख नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस भवन येथून वाजत गाजत रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये वेगवेगळ्या समुदायाचे लोक सहभागी झाले होते. महाविकास आघाडीची रॅली वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी गेली. या रॅलीत डमी शाहरुख खान लोकांचे लक्ष वेधून घेत होता.

अर्ज भरतेवेळेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. त्याचबरोबर लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची उपस्थिती होती. यावेळी प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता काँग्रेस भवना समोर भव्य अशी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवना पासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिविल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली.

Tags:    

Similar News