कांग्रेसचा भारत जोडो यात्रेचा झंजावात आता कर्नाटकात

Update: 2022-09-30 02:45 GMT

काँग्रेसचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भारत जोडो यात्रा शुक्रवारी कर्नाटकात दाखल होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा केरळच्या सीमेला लागून असलेल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट मार्गे राज्यात दाखल होईल.


कर्नाटकातील ५११ किमीचं अंतर ही यात्रा सुमारे २१ दिवसांमध्ये पार करेल अशी आशा कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांना वाटतेय. २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात या भारत जोडो यात्रेचं महत्व फार वाढलं आहे. त्यामुळे पक्षात एक नव चैतन्य निर्माण होईल असं म्हटलं जातंय. याशिवाय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर देखील सर्व देशाचं लक्ष केंद्रीत करणं हे देखील भारत जोडो यात्रेचं यापुढचं लक्ष्य असणार आहे. शिवाय यासाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वॉड्रा यादेखील या यात्रेत सहभागी होणार आहेत पण कधी सहभागी होतील याची तारीख नंतर घोषीत करण्यात येणार आहे.


३० सप्टेंबर रोजी गुंडलुपेट येथे सकाळी ९ वाजता यात्रेचा कर्नाटक टप्पा सुरू होईल हे लक्षात घेऊन शिवकुमार म्हणाले, २ ऑक्टोबर ला गांधी जयंतीच्या दिवशी, खादी आणि ग्रामोद्योग केंद्रासाठी प्रसिद्ध असलेल्या नंजनगुड तालुक्यातील बदनावलू येथे एक कार्यक्रम आहे. ज्याला स्वतः महात्मा गांधींनी भेट दिली होती.




 


"दसऱ्याला दोन दिवस सुट्टी असेल; बल्लारीमध्ये जाहीर सभा होईल; त्यादरम्यान राहुल गांधी दररोज तरुण, महिला, नागरी समाज, विद्यार्थी, आदिवासी समाज आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत, आणि टीम तयार करण्यात आली आहे.," असं शिवकुमार यांनी सांगितले.


ही यात्रा चामराजनगर, म्हैसूर, मंड्या, तुमाकुरू, चित्रदुर्ग, बल्लारी आणि रायचूर जिल्ह्यांचा समावेश करणार आहे. रायचूर येथून पदयात्रा तेलंगणात दाखल होईल.

रायचूर मार्गे राज्यातून बाहेर पडण्यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी बल्लारी येथे एक विशाल जनसभा आयोजित करण्यात आली आहे


काँग्रेससाठी बल्लारी महत्त्वाची आहे कारण सोनिया गांधी यांनी तिथून यापूर्वी लोकसभा निवडणूक जिंकली होती आणि पक्षाने तत्कालीन भाजप सरकार आणि तेथील कथित खाण माफियांच्या विरोधात जिल्ह्यात पायी मोर्चाही काढला होता, जो 2013 मध्ये विधानसभा निवडणुकीच विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरला होता.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींना राज्य आणि समाजाचे प्रश्न उपस्थित करून या यात्रेचा पुरेपूर उपयोग प्रदेश काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News