नकला बहादूर राजकारणात खूप, राज ठाकरे यांना मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

Update: 2023-08-17 05:22 GMT


राज ठाकरे यांनी पनवेल येथील सभेतून भाजपवर टीका केली. यावेळी अमित ठाकरे दौऱ्यावर असताना समृद्धी महामार्गावरचा टोलनाका फोडण्यात आला. त्याच्यावरून भाजपने केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

राज ठाकरे म्हणाले, आमचा अमित दौऱ्यावर असताना टोल फुटला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आधी रस्ते बांधायला शिकावेत, असा सल्ला दिला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, भाजपने दुसऱ्यांचे नेते न फोडता पक्ष वाढवायला शिकावं. तसंच कानपट्टीवर बंदूक ठेऊन नेत्यांना भाजपमध्ये घेतलं जातं. त्यामुळे नेत्यांना गाडीत झोपून जावं लागत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.


भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, कानपट्टीला बंदूक लावून भाजपमध्ये कुणी येत नसतं. कुठलाही नेता एवढा कमजोर नाही. तर भाजप म्हणजे भारतीय जनतेचा पक्ष आहे. मात्र राजकारणात अनेक नकला बहादूर असतात, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News