पंकजा मुंडेंची पवारांशी जवळीक, हा फडणवीसांना इशारा आहे का?

"Hats Off": BJP's Pankaja Munde On Sharad Pawar's Busy Schedule Amid Covid

Update: 2020-10-28 11:08 GMT

'पवारांचा इरा आता संपला आहे'. असं म्हणत शरद पवारांची हेटाळणी करणाऱे देवेंद्र फडणवीस, आणि आज त्याच पवारांचं शरद पवार hats off... असं म्हणत कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे... दोघांच्या वक्तव्याचा अर्थ सांगणारं विश्लेषण...

ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांवर शरद पवार, धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे बंधू भगिनी एकत्र आल्याची चर्चा सुरु असताना सध्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विट मुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर झालेल्या बैठकीत पंकजा यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा देखील केली. ही बैठक सकारात्मक झाली. मात्र, या बैठकीतीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांची स्तुती करणारं ट्विट केलं आणि नॅशनल मीडियाची हे ट्विट हेडलाइन झालं.

Full View

काय आहे ट्विट?

@PawarSpeaks hats off ... कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले ... पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.

दरम्यान शरद पवारांचा इरा आता संपला आहे. असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना हा पंकजा मुंडे यांनी लगावलेला टोला आहे का? आज शरद पवार यांची केलेली स्तुती आणि दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची केलेली स्तुती हा कोणाला इशारा आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Tags:    

Similar News