गुजरात काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता... हार्दिक पटेल काँग्रेस सोडणार?

2022 मध्ये गुजरात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यापार्श्वभुमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मात्र गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षानेच थेट पक्षनेतृत्वावर सवाल उपस्थित केले आहे.

Update: 2022-04-23 05:32 GMT

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गुजरात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पाटीदार समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या हार्दिक पटेल याने थेट पक्ष नेतृत्वावर सवाल केले आहेत. तर हार्दिक पटेल याने भाजपचे तोंडभरून कौतूक केले आहे. त्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मात्र गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल याने काँग्रेसवर टीका केली आहे.

हार्दिक पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्षाची अवस्था लग्नानंतर नसबंदी केलेल्या मुलासारखी आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांकडून आमचा अपमान केला जात असल्याची टीका पटेल याने एबीपी न्यूजशी बोलताना केली. तर त्यावर स्पष्टीकरण देतांना काँग्रेस नेते नरेश पटेल म्हणाले की, काँग्रेसने कोणाचाही अपमान केला नाही. मात्र आता हार्दिक पटेल यांनी त्यांना कोणत्या दिशेला जायचे हे ठरवावे, असे म्हटले आहे.

हार्दिक पटेलकडून भाजपचे कौतूक

पाच राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल याने भाजपचे तोंडभून कौतूक केले आहे.

यावेळी बोलताना हार्दिक पटेल म्हणाला की, भाजप हा सक्षम पक्ष आहे. तर काँग्रेसने चांगला विरोधी पक्ष संघर्ष करायला हवा. परंतू जर काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भुमिका बजावत नसेल तर आम्हाला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल, असे सुतोवाच हार्दिक पटेल याने केले. तर भाजप हा सक्षम पक्ष असून भाजपकडे चांगले नेतृत्व आहे. याबरोबरच भाजपमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो, अशा शब्दात हार्दिक पटेल याने भाजपचे कौतूक केले.

मी हिंदू आणि रामभक्त

हार्दिक पटेल याने यावेळी सांगितले की, मी रामभक्त हिंदू असून मला त्याचा गर्व आहे. तसेच मी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 4 हजार भगवद्गीता वाटप करणार आहे. तर मी राजकीय परिस्थिवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे हार्दिक पटेल याने सांगितले.

हार्दिक पटेल कोण आहे?

गुजरातमध्ये पटेल समुदायाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये आंदोलन छेडले होते. तर तेव्हापासून हार्दिक पटेल चर्चेत आले. तर त्यानंतर भाजपवर टीका करत हार्दिक पटेल याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर काँग्रेसने हार्दिक पटेल याला गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष केले आहे. मात्र गुजरात काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे गेल्या काही दिवसात हार्दिक पटेल यांच्या वक्तव्यावरून समोर आले होते. त्यातच आता हार्दिक पटेल याने काँग्रेसवर टीका केल्याने आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर हार्दिक पटेल भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News