काँग्रेसला बसणार मोठा धक्का? हार्दिक पटेल यांच्या कृतीने चर्चांना उधाण

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वावरून आणि पक्षाच्या कामगिरीवरून खल सुरू आहे. त्यातच आता गुजरातमधील काँग्रेसचा महत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या कृतीने काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Update: 2022-05-03 04:19 GMT

गेल्या काही दिवसांपासून देशात काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने चिंतन शिबीराचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वावर टीका करत गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी आपली खदखद व्यक्त केली होती. त्याबरोबरच हार्दिक पटेल यांनी भाजपच्या पक्षबांधणीचे आणि नेतृत्वाचे कौतूकही केले होते. त्यानंतर हार्दिक पटेल काँग्रेस सोडणार का? यावरून चर्चांना उधाण आले होते. त्यापाठोपाठ आता हार्दिक पटेल यांनी केलेल्या कृतीमुळे गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पटेल समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे हार्दिक पटेल यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी गुजरात काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्याबरोबरच आपण हिंदू असून मी भगवद्गीता वाटप करणार आहे, असेसुध्दा म्हटले होते. तर यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपचे कौतूक केले होते. त्यानंतर हार्दिक पटेल काँग्रेस सोडणार का? याविषयी चर्चांना उधाण आले होते. मात्र आता हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्वीटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

आता हार्दिक पटेल यांच्या ट्वीटर बायोमध्ये Proud Indian Patriot. Social and Political Activist. Committed to a better India असे लिहीले आहे. मात्र त्यांनी आपल्या ट्वीटरवरून काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे.


 



हार्दिक पटेल काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दुसरीकडे हार्दिक पटेल यांनी 12 तासांपुर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले ट्वीट रिट्वीट केले आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रोफाईलवर मै लढूंगा और जितूंगा असे लिहीलेल्या अक्षरांसह काँग्रेसचे पक्षचिन्ह कायम ठेवले आहे. त्यामुळे हार्दिक पटेल हे काँग्रेस सोडणार की काँग्रेसमध्येच राहणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे हार्दिक पटेल नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News