Ajit Pawar अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांची आमदारकी जाणार

अजित पवार यांच्यासह नऊ जणांना अपत्रातेची नोटीस, जयंत पाटील यांची माहिती

Update: 2023-07-02 19:17 GMT

अजित पवार यांच्यासह नऊ जणांना अपत्रातेची नोटीस, जयंत पाटील यांची माहिती

नऊ सदस्यांनी पक्षाला कल्पना न देता पक्षाच्या विरोधात जाऊन राजभवनात जाऊन शपथ घेतली.ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कृती बेकायदेशीर आहे. त्यामुळे दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखालल शिस्तपालन समितीने या कृतीची  नोंद घेत या सदस्यांवर अपात्रातेच्या कारवाई संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार पाठवली आहे. यासंदर्भात ईमेल आणि what's app वर पत्र पाठवले आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी उद्या आमची बाजू ऐकून घ्यावी, ही विनंती केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.




तसेच निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून पक्षात घडलेल्या कृतीची माहिती दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेही याची सुनावणी घ्यावी, असं मत व्यक्त केले. याबरोबरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ज्यांनी पक्षाची शिस्त मोडली त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने कायदेशीर पावले उचलली आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा, असंही जयंत पाटील म्हणाले.



महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारसाहेबांसोबत आहेत. सर्व जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहेत. ९ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल असे जाहीर केले होते त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत.विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

 


 


Tags:    

Similar News