सरकारमध्ये एक वाक्यात नाही, १८ की ४५ एकदा ठरवून घ्या...

Update: 2021-03-17 10:52 GMT

राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 13 मार्चला पुण्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीत कोरोना बाधितांमध्ये तरुण गट पण आहे. हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान 5 दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात 18 वर्षा पुढील सर्वांना कोरोनाची लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

यावरून सरकारमध्ये कोरोना लसीकरणाच्या वयाबाबत समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील मंत्र्यांमध्ये धोरणात्मक बाबींसंदर्भात सरकार म्हणून एकवाक्यता दिसून येत नाही. मध्यंतरी वीज बिलाबाबत, तसंच MPSC बाबत सरकारच्या मंत्र्यांचे वेगवगळी विधान समोर आली होती.

त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कोरोना लसीकरणाबाबत वेगवेगळी मागणी समोर आली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.

Tags:    

Similar News