सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता

काँग्रेस नेते शशी थरूर यांना पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या निकालानंतर आपण समाधानी असल्याचे थरूर यांनी म्हंटले आहे.

Update: 2021-08-18 09:48 GMT

नवी दिल्ली// काँग्रेस नेते शशी थरूर यांना पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. शशी थरूर यांना आयपीसीच्या कलम 498 अ आणि 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली आरोपी करण्यात आले होते.

दरम्यान न्यायालयाने निर्दोष असल्याबाबत निकाल दिल्याने थरूर यांनी न्यायाधीशांचे आभार मानले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या साडे सात वर्षांपासून मला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. आता या निकालाने आपण समाधानी असल्याचे थरूर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याबाबत आरोप ठेवल्यानंतर तयार थरूर यांच्या बाजूने वरिष्ठ वकील विकास पहवा यांनी न्यायालयाला सांगितले की , एसआयटीने केलेल्या तपासात त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. आणि त्यांना सर्व आरोपातून पूर्णपणे मुक्त केले गेले आहे.

यापूर्वी 27 जुलै रोजी ही सुनावणी झाली होती, परंतु या प्रकरणात आणखी काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मागून शशी थरूर यांच्यावतीने नवीन अर्ज देण्यात आला होता. त्यामुळे निर्णय 18 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला.

व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचे 2010 मध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. लग्नानंतर दोघेही मीडियासमोर उघडपणे येत होते.

17 जानेवारी 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांचे निधन झाले होते. सुनंदा पुष्कर या दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 च्या रात्री मृत अवस्थेत आढळल्या होत्या. पुष्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि हत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी शशी थरूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचेही नावही समोर आले होते.या सर्व आरोपातून थरूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News