गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया...काय म्हणाले वाचा सविस्तर

Update: 2024-02-03 13:28 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपुस करत याप्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेतून बचावलेल्या महेश गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे. गोळीबारातून झालेल्या जखमा लवकरात लवकर भराव्या आणि महेश यांची उपचारादरम्यान व्यवस्थित काळजी घ्यावी यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली.

अजित पवार यांची प्रतिक्रिया...

कुणाच्या बद्दल माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रीतसर नोंद त्याठिकाणी केली पाहिजे. पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे, अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणवीस त्यांच्याशी पण मी बोलणार आहे. एवढ्या टोकाची त्यांनी मजल का मारली ? असा सवाल त्यांनी यावेळी केला तसेच त्यांचं फोन कॉलवरचं संभाषण सुध्दा ऐकलं, ते काही कायद्याला धरुन नव्हतं, असंही ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया...

पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचं सत्य आपल्याला बाहेर काढावं लागेल यासाठी मी वरीष्ठ स्तरावरुन चौकशीचे आदेश दिले आणि यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल.

शरद पवार यांची प्रतिक्रिया...

सत्तेचा गैरवापर केला जातोय, कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे, सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे असा सवाल यावेळी शरद पवारांनी गायकवाड गोळीबार प्रकरणावर उपस्थित केला

Tags:    

Similar News