संजय गायकवाडांच्या बेशिस्त वक्तव्यामुळे भुजबळ भावूक, काय म्हणाले वाचा...

Update: 2024-02-02 09:58 GMT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्यावरुन आता राज्यातील महायुतीमध्येय नवा वाद पेटला आहे. मनोज जरांगे पाटीन यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आरक्षणासंदर्भात शासन निर्णय जारी केल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणविरोधी आक्रमक भूमिका घेत थेट सरकारविरोधात हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी छगन भूजबळांवर जहरी टिका करत कंबरेत लाथ घालून मुख्यमंत्र्यांनी भूजबळ यांना मंत्रीमंडळातून बाहोर काढून टाकलं पाहिजे अशी मागणी केली.

संजय गायकवाड यांच्या बेशिस्त वक्वव्यावर छगन भूजबळांनी आज प्रतिक्रिया देत हे असं बोलणं ऐकूण मला वाईट वाटल्याचं म्हटले आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्यं ऐकुन थोडं वाईट वाटलं. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सर्वसामान्य माणसाला आहेच, तसाच तो आमदारांनाही आहे, मात्र त्यांनी जी भाषा वापरली ती काही बरोबर नाही. अशा शब्दात छगन भूजबळ यांनी आपलं दूखः व्यक्त केलं.

छगन भुजबळाचे आमदार गायकवाड यांना प्रत्युत्तर

छगन भूजबळ म्हणाले की, गायकवाड ज्या शिवसेना नावाच्या संस्थेत शिक्षण घेत आहेत, त्या संस्थेत मी वरीष्ठ प्राध्यापक होतो. भाषा जरा जपून वापरली पाहिजे. त्याबद्दल त्यांचे जे नेते आहेत, ते शिंदे साहेब पाहतील. मला मंत्रीमंडळातुन बाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे आणि ते मला मान्य आहे. मात्र दुसरं जे वक्तव्य आहे की, कंबरेत लाथ घालून मंत्रीमंडळातून लाथ घालून हाकलून लावा, असं ते म्हणाले. पण मला वाटतंय ते तसं काही करणार नाहीत. कारण गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे नेते ज्या आनंद दिघे यांना गुरू मानतात. त्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामूळे त्यांनाही कल्पना आहे की, अशा प्रकारे लाथ घालण्याची भाषा योग्य नाही.

Tags:    

Similar News