मराठा आरक्षणासाठी‌ घटनादुरुस्तीची‌ मागणीसाठी 'हा' ठराव मंजूर

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा ने ठराव करत मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. ओबीसी आरक्षणाचा ठराव वेळी गोंधळ घातल्याने बारा भाजपचे आमदार निलंबित करण्यात आले मराठा आरक्षणाचा ठराव यावेळी भाजपचे सर्व आमदार अनुपस्थित होते.

Update: 2021-07-05 14:33 GMT

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करणेबाबतच्या ठरावाचा मसुदा...

महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 110 अन्वये ठराव

महाराष्ट्र विधानसभा

ज्याअर्थी,माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे,2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील  लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२) मधील कलम 2 (जे),कलम 4(1)(ए) आणि कलम 4(1)(बी) अवैध ठऱवितांना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली 50% ची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही,असा निर्णय दिलेला असणे;

ज्याअर्थी,केंद्र सरकारने 50% ची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे;

ज्याअर्थी, आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दुर करणे आवश्यक असणे,

ज्याअर्थी,त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य सांविधानिक तरतूद त्वरीत करणे आवश्यक असणे,

त्याअर्थी, महाराष्ट्र विधानसभा, याद्वारे माननीय न्यायालयांच्या न्यायनिर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50%  इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करीत आहे.

Tags:    

Similar News