भाजपला महाविकास आघाडीचा दे धक्का, सांगली, जळगावनंतर अहमदनगर महापालिकेत सत्ता गमावली

Update: 2021-06-30 04:49 GMT

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

कॉंग्रेसचीही साथ...

उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या 4 नगरसेवक सुद्धा हजेरी लावली. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यादा महापौर व उपमहापौर पदाची निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

महापालिकेतील तिसरी बिनविरोध निवडणूक

महापालिकेतील ही तिसरी बिनविरोध निवडणूक आहे. या अगोदर 2012 मध्ये शिवसेनेच्या शीला शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज मतदाना अगोदर मागे घेतल्याने शिंदे बिनविरोध महापौर झाल्या होत्या. तर 2016 मध्ये सेनेच्या सुरेखा कदम यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम बिनविरोध महापौर झाल्या.

2021 मध्ये म्हणजे आता विरोधकांचे अर्ज न आल्याने शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस चा उपमहापौर सुद्धा बिनविरोध झाला आहे, अधिकृत घोषणा आज केली जाणार आहे.

भाजपने तिसरी महापालिका गमावली...


भाजपला धक्का...

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. या पॅटर्नची देशभर चर्चा होती. मात्र, या वेळेला महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपला दे धक्का दिला आहे.

भाजपने तीन महापालिकेत सत्ता गमावली...

भाजपला महाविकास आघाडीचा दे धक्का, सांगली, जळगावनंतर अहमदनगर महापालिकेत सत्ता गमावली

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्याने सांगलीमध्ये जयंत पाटलांनी तर जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन भाजपकडून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आता अहमदनगरमध्ये भाजपला दे धक्का महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.

Tags:    

Similar News