शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार?, मनसेच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

तलवार उंचावल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Update: 2022-04-14 07:29 GMT

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेत तलवार उंचावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रीया देतांना शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तलवार उंचावल्याचा दाखला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याने शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरेंवरही गुन्हा दाखल होणार का? अशी चर्चा रंगली आहे. (FIR against Raj Thackeray)




 


मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील (MNS Gudhipadva melava) राज ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली होती म्हणून राज ठाकरे यांनी तलवार उंचावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande Tweet) यांनी शरद पवार, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या नेत्यांवरही गुन्हा दाखल होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.


 



संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये त्यांनी उध्दवा अजब तुझे सरकार असे म्हटले आहे. तर व्हिडीओमध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तलवार उंचावल्याचा दाखला देण्यात आला आहे. (Sandeep Deshpande Share a video)

संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, ठाणे येथे उत्तर सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मग शरद पवार, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तलवार दाखवल्याप्रकरणाचं काय? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर तलवार दाखवल्याप्रकरणी एक न्याय आणि इतरांना एक न्याय असं का? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.


 



राज ठाकरे यांच्यावर तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आता शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे

Tags:    

Similar News