आमदार पळून जाऊ नये म्हणून कॉंग्रेसची नामी शक्कल...

Update: 2022-03-08 08:52 GMT

पाच राज्याच्या विधानसभेचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. Exit poll च्या अंदाजानुसार अनेक राज्यात काट्याची टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने 2017 ची चूक पुन्हा होऊ नये म्हणून आपल्या आमदारांना ताब्यात ठेवायचा निर्णय घेतला आहे.

गोव्यामध्ये 2017 ला कॉंग्रेसला सर्वाधिक 15 जागा मिळून देखील कॉंग्रेस गोव्यात सरकार स्थापन करू शकले नव्हते ही बाब लक्षात घेऊन गोव्यातील सर्व कॉंग्रेस उमेदवार उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये चेक इन करण्याची शक्यता आहे. निवडणूक मोजणीच्या दिवशी देखील अनेक उमेदवार मतमोजणी केंद्रावर जातील की नाही. या बाबत देखील कोणतीही सप्ष्टता समोर आलेली नाही. उमेदवारांचे प्रतिनिधी मतदार केंद्रावर थांबतील असं असं सांगितलं जात आहे.

दरम्यान फक्त गोव्यासाठीच नाही तर 5 राज्याच्या निवडणूकांच्या निकालाच्या दृष्टीकोनातून आमदारांचा घोडे बाजार होऊ नये म्हणून कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक समिती नेमली आहे. या समितीत भूपेळ बघेल, अशोक गेहलोत, सचिन पायलट, चरणजीत सिंह चन्नी, जयराम रमेश, सुनिल जाखड, हरीश रावत, प्रितम सिंह, पी चिंदबरम, सलमान खुर्शिद, पी. एल. पुनिया या नेत्यांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News