अवकाळी पावसाचा पुन्हा फटका, द्राक्ष पिकाचे नुकसान

Update: 2022-04-12 12:17 GMT

सोलापुरात सोमवारी वादळी वारे आणि गारपीटीमुळे शेतीपिकांसह अनेक घरं तसेच शाळांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कासेगावात काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेला सुरूवात झाली. त्यानंतर काहीवेळ गारपिटही झाली.

त्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाले. गारपिटीच्या माऱ्यामुळे विक्रीसाठी तयार असलेल्या द्राक्षाचे घड फुटले आहेत. त्याचबरोबर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या किचनशेडचे पत्रे, नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे जिवीतहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्याप्रमाणात झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगतले.अवकाळी पावसाचा पुन्हा फटका, द्राक्ष पिकाचे नुकसान

Full View

Tags:    

Similar News