ग्राऊंड रिपोर्ट : मोदी सरकारच्या कायद्याने गावातील एकता धोक्यात आली आहे का?

Update: 2020-12-08 06:53 GMT

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय. हरियाणातील असेच एक पदवीधर तरुण शेतकरी निर्मलसिंह हे आपल्या हक्कासाठी या लढाईत उतरले आहेत. १२ एकर शेती असेलेले निर्मलसिंह सांगतात की, "या कायद्यामुळं आमचं भवितव्य धोक्यात आलं आहे. माझ्या घरात दोन बहिणी आणि आई असून आमच्याकडे दोन मजूर देखील शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. निर्मलसिंह सांगतात... सध्या या कायद्यामुळं गावातील वातावरण दुषित झालं आहे. गावातील काही मोदी भक्तांना हे समजत नाही. ते याला विरोध करत आहे", असा आरोप ते करत आहेत.

"ज्या पद्धतीने सरकार हमीभाव हटवून करार पद्धती आणत आहे हे आम्हा शेतकऱ्यांवरच्या शेतीवर घाला घालण्याचा प्रकार आहे. अधिकारी, तज्ञ या कायद्याच्या विरोधात असूनही हे सरकार मनमानी करत आहे. परंतु मोदी सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही युवा पिढी तुमचा मनमानी कारभार चालू देणार नाही. धर्माच्या नावाखाली आम्ही वेगळे होणारं नाही. आम्ही हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवणार आहोत."

दिल्लीच्या बॉर्डरवर निर्मलसिंह सारखे अनेक तरुण ठिय्या मांडून बसले आहे. निर्मलसिंह यांची नेमकी भूमिका काय आहे ते जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....


Full View


Similar News