ऊसतोड महिला कामगारांचे सर्वेक्षण करा; राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण

ऊसतोड कामगार महिलांचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत

Update: 2023-07-09 10:15 GMT

 यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार महिला आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऊसतोड कामगार महिलांचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍड. संगीता चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या महिलांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात येईल. त्यांची सर्व माहिती अॅपमध्ये भरण्यात येणार आहे. ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आल्याचे राज्य महिला आयोग सदस्य ऍड. संगीता चव्हाण म्हणाल्या..

TagsFull View

Tags:    

Similar News