पाण्याअभावी कापसावर लाल्या रोगच्या प्रादुर्भाव..

यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस आणि २७ दिवसापासून पाऊस नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला

Update: 2023-09-05 12:22 GMT

राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हे म्हणून खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार ची ओळख आहे .एकट्या नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाचे लागवड करण्यात येते. मात्र यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस आणि २७ दिवसापासून पाऊस नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, अनेक ठिकाणी कापसाचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच कापूस क्षेत्र धोक्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकरी दुष्काळाचा सावटाखाली असतानाच कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्याला कमी दरामुळे संकटात सापडला होता. तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीने जिल्ह्यात सरासरीचा अवघा ४०% पाऊस झाला आहे. पाऊसही नियमित नसल्याने कापसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी कापसाचे पीक उध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेला उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील तब्बल एक लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाला याच्या फटका बसला असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती आहे. सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगळे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा दावा करत असले, तरी दुसरीकडे महिनाभरापासून पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत असला तरी सरकार खानदेशातील दुष्काळा संदर्भात शब्दही काढायला तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत असल्याचे कापूस उत्पादक शेतकरी जगन्नाथ मराठे आणि प्रकाश पाटील यांनी सांगितले.Full View


Tags:    

Similar News