पावसाने दडी मारल्याने भात पीक करपले

इगतपुरी तालुक्यातील मुख्य पीक असलेली भातशेती पावसाने दडी मारल्याने करपण्याच्या मार्गावर

Update: 2023-09-02 13:30 GMT


शेतकरी हा आपल्या शेतीला पोटच्या पोराप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने इगतपुरी तालुक्यातील मुख्य पीक असलेली भात शेती धोक्यात आली आहे. शेतकरी आधीच गारपिटीने त्रस्त झालेला आहे. त्यात आता पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे ही सुकत चालली असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अजून दोन ते तीन दिवस पाऊस पडला नाही तर उभे भातपीक हे सुकून जाईल, यामुळे शेतकरी संकटात  सापडल्याचे पांडुरंग वारूसंघे सांगत आहेत.

Full View

Tags:    

Similar News