Nashik Unseasonal Rain | नाशिकच्या बागायतदारांना गारपिठीचा तडाखा, द्राक्ष बागांचं नुकसान...

Update: 2023-11-27 12:03 GMT

राज्यात अनेक ठिकाणी मागच्या तासात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकसह, सातारा, कोकण अशा अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतककऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच शेतातल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या गारपीटी सह जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. गारपीट झाल्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाचा बागाईतदार शेतकऱ्यांना मोठ्या नूकसानाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानामूळे या वर कायमस्वरुपी ऊपाय काढावा आशा मागण्या शेतकऱ्यांनी केली आहे.

बागायतदार शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्या

१ . दीड ते दोन लाख एकरी नुकसान भरपाईची मिळावी.

२ १ रुपयात पिकविमा योजनेत फळबागांच समावेश करा.

३ पिक विमा योजनेत फळबाग शेतकऱ्यांचाही सामावेश करा

या मागण्यांसह इतरही मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून या अगोदर द्राक्ष बागायतदार संघटनेने कव्हर क्रॉपची शासनाकडे मागणी केली होती .मात्र ती मागणी फक्त शंभर हेक्टर एवढीच दिलेली असून कमीत कमी एक हजार हेक्टर ही प्रायोगिक तत्त्वावर शासनाने द्यावी अशी ही मागणी बागायतदार शेतकरी संघटनेने केली .

मागच्या वर्षाची पिकविमा योजनेची मदत आजून मिळालेली नाही असही बागायतदार शेतकरी संघटनेने सांगितले.

Full View

Tags:    

Similar News