पावसाचा खंड ; शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मिळणार?

पावसाचा खंड पडल्यानंतर नियमानुसार दोन दिवसांत दीड लाख हेक्टरची पाहणी करण्याचे विमा कंपनीला आदेश दिल्याचे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे त्यांनी सांगितले.

Update: 2023-08-22 13:30 GMT

गेल्या तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीकं माना टाकू लागली आहेत. प्रधानमंत्री पीक विमा निकषानुसार २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतीनिधींकडून होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील आवर्षणग्रस्थ ९ मंडळासह दोन दिवसांत यात समाविष्ट होऊ शकतात अशा दीड लाख हेक्टर क्षेत्राची तपासणी करून ४ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विमा कंपनीला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. अहवालानंतर किती अग्रीम द्यायचा ते ठरवता येईल असे डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद म्हणाले.


Full View

Tags:    

Similar News