Maharashtra MLC Polls: निष्ठावंतांचा पत्ता कट! मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे यांना तिकिट नाहीच...
भाजप ची विधानपरिषदेची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पंकजा मुंडे यांना तिकिट नाकारण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात पंकजा यांना तिकिट मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पंकजा मुंडे यांचा या यादीत समावेश नाही. तसंच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील विधानपरिषदेची उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांचा ही नेहमी प्रमाणे पत्ता कट करण्यात आला आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, तावडे यांचा देखील भाजपने पत्ता कट केला आहे.
आय्यारामांसोबत नवीन चेहऱ्यांना संधी...
वंचित बहुजन आघाडीला रामराम करुन विधानसभेच्या निव़डणूकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढलेले गोपिचंद पडळकर यांना भाजपने संधी दिली आहे.