खडकदेवळा येथे लंपी आजाराने गाय बाधित

Update: 2023-09-28 02:30 GMT

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील शेतकरी श्रीराम गडबड ब्राह्मणे यांच्या गाय पशुधनाला लंपी आजाराचे लक्षण दिसून येत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी श्रीराम ब्राह्मणे यांच्याकडे आठ ते दहा पशुधन आहेत. त्यापैंकी एका पशुधनाला गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अचानक लंपी या आजाराचे पशुधनाच्या अंगावर गाठी गाठी दिसून आल्याने या लक्षणामुळे मात्र शेतकरी संकटात सापडला आहे. तरी पशुसंवर्धन विभागाने त्वरित याबाबत दखल घेऊन खडकदेवळा येथील लंपी आजाराबाबत योग्य ते शिबिर राबवून हा आजार पसरवण्यापासून थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी श्रीराम ब्राह्मणे यांनी केली आहे.

Full View


Tags:    

Similar News