लोडशेडिंग मुळे कांदा उत्पादक हैराण

चोपडा तालुक्यात कांदा लागवडीला प्रारंभ; मात्र लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण

Update: 2023-09-04 01:30 GMT

 चोपडा तालुक्यात यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झालेला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली परंतु, चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे लागवड होत असते ज्यांच्याकडे शेतात पाण्याची व्यवस्था ट्यूबवेल आहे ते शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर करीत असतात परंतु राज्य सरकारने लोडशेडिंग जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील अनियमित विजेमुळे कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. कांदा लागवडीसाठी मजूर लावून कांदा लावला जात नाही आहे.जोपर्यंत वीज पुरवठा असतो तोपर्यंतच कांदा लागवड होत असते नाहीतर वीज पुरवठा येईपर्यंत मजुरांना बसून राहावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे. लोड शेडिंग च्या टाइमिंग ठरवून दिला पाहिजे व त्यानुसार पुरवठा द्यावा जेणेकरून कांदा लागवडीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही, अशी भावना कांदा लागवड करणारे शेतकरी व्यक्त करत आहेत.

Full View

Tags:    

Similar News