बर्ड फ्लू की मीडिया फ्लू ?

बर्ड फ्ल्यू बाबत बेजबाबदार प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनामुळे पोल्ट्री उद्योगाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून बर्ड फ्लू चा मूळ उद्गम कावळा आणि बदकांमध्ये असताना वृत्तांकन करताना मात्र व्यावसायिक पोल्ट्रीचे फोटो दाखवले जातात. त्यामुळेच बर्ड फ्लू की मीडिया फ्लू ? असा प्रश्न उपस्थित केला आहे पोल्ट्री अभ्यासक दीपक चव्हाण यांनी...

Update: 2021-01-21 06:37 GMT

बर्ड फ्लू कावळ्यात, मीडियात फोटो मात्र ब्रॉयलर्सचे. दररोज शेकडो कोटींचे नुकसान पाहून मीडिया विचारतो, पॅकेज हवे का पोल्ट्रीला ? फार्मर म्हणाला, आधी तुम्ही व्हा बाजूला. आज महाराष्ट्रात ब्रॉयलर्सचा खप निम्याने घटलाय, उत्पादन खर्च 75 रुपये प्रतिकिलो तर लिफ्टिंग रेट आहे 40 रुपये. किमान दोन महिने कथित बर्ड फ्लूचा नकारात्मक प्रभाव राहिल. कमर्शिअल ब्रॉयलर्स, लेअर्समध्ये बर्ड फ्लूची नोंद नसतानाही हजारो कोटींचे नुकसान माथी पडलेय.

कोंबड्यांमुळे कोरोना होत नाही, हे सिद्ध होईपर्यंत हजारो कोटींचे नुकसान झालेले असते...FSSAI या सरकारी यंत्रणेने प्लॉस्टिक अंडी ही अफवा आहे, असे सांगूनही आजही काही लोकांना अफवाच खरी वाटतेय. आताही केंद्र व राज्य सरकारी यंत्रणांनी चिकन, अंडी सेफ आहे, असे सांगूनही ग्राहक त्याकडे वळत नाहीत. कारण मीडियाचा प्रभाव.

मध्यंतरी आयुर्वेदिक कोंबडीची चर्चा होती. कडकनाथला तर नाहक बदनाम केले गेले. टीव्ही, पेपर, फेसबूक - माहितीचा एवढा मारा सुरू आहे - खऱ्या खोट्याचा काहीच ताळमेळ नाही. 

Tags:    

Similar News