International Year of Millet तुर्कीच्या बाजरीतून लाखोंचे उत्पन्न..

अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार झाला असताना.. अंधारातही उजेड पाडणारे शेतकरी महाराष्ट्रात दिसतात.. तुर्कीची बाजरी उत्पादित करून लाखोंचे उत्पादन घेणारे धुळे तालुक्यातील बोरीस गावचे शेतकरी डॉ. अनिल जैन यांनी तुर्की देशी बाजरी उत्पादनाची यशोगाथा MaxKisan वर नक्की पहा....

Update: 2023-05-16 10:40 GMT


धुळे तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी डॉ. अनिल जैन यांनी तुर्की देशी वाण ही उन्हाळी बाजरी ची पेरणी करून यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. एक एकर मधून 30 क्विंटल बाजरीचे उत्पादन त्यांनी घेतले असून सध्या ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांनी डॉ. अनिल जैन यांच्या शेतात गर्दी करीत आहेत.

खानदेशातील बोरीस हे गाव सती मातेच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील शेतकरी डॉ.अनिल जैन हे सध्या तुर्कीच्या बाजरीमुळे तालुक्यात चांगलेच चर्चेत आले असून त्यांनी तुर्की देशी वाण बाजरीचा जानेवारी महिन्यात पेरा केला होता. ही बाजरी आता काढणीस आली असून डॉक्टर अनिल जैन यांनी दहा एकर शेतात विविध प्रयोग करत यंदा या बाजरीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यावर्षी त्यांनी तुर्की देशातील बाजरीची बियाणे मिळविले. या बाजरीची उंची 10 ते 11 फुटांपर्यंत वाढली असून यात 3 फुटांपेक्षा अधिक लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे यामुळे त्यांना एका एकर मध्ये 30 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित असून चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या बाजरीची विक्री होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Full View

एका एकरमागे 12 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना अपेक्षित असून ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी, डॉ. अनिल जैन यांच्या शेतात होत आहे. शेतात आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी विकसनशील व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. मात्र डॉ. अनिल जैन यांनी कृतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून इतर शेतकऱ्यांनी देखील या माध्यमातून विकसनशील प्रयोग करावेत असे आवाहन डॉक्टर अनिल जैन यांनी केले आहे.

यंदा अतिवृष्टीमुळं धुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं गहू, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी बाजरी काळी पडली आहे, परिणामी त्याची विक्री होत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, मोराणे (उत्तर प्रदेश) आदी भागांतून बाजरी विक्रीसाठी येत महाराष्ट्रात येत आहे. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक, शहरी भागातील चाकरमान्यांकडून बाजरीला मोठी मागणी आहे. या बाजरीला सध्या क्विंटल मागे दोन हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.


Tags:    

Similar News