परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन

Update: 2019-10-28 11:56 GMT

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित २५ हजार रुपये जमा करावे आणि गावागावात जाऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा करावा. अशी मागणी करत परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वसमत-परभणी या रस्त्यावर तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केलं आहे.

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पीक परतीच्या पावसामुळे हातातून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. शासनाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची त्वरित मदत करावी अन्यथा येत्या 5 तारखेपासून जिल्हाबंदचा इशारा स्वाभिमानी संघटनेकडुन देण्यात आलाय. पाहा व्हिडीओ..

https://youtu.be/vMxFkx1rAG8

Similar News