Maharashtra Farmers : दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत

Update: 2023-11-15 05:10 GMT

राज्यभरात दिवाळी जोरदार सुरू असली तरी शेतकरी चिंतेत आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाने एक ते दीड महिने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अन्नधान्य पिकवूनही त्याला बाजारभाव मिळत नसल्याने राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्याच्या घरात यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे.

अन्नधान्य पिकवूनही त्याला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे खानदेशातील बहुसंख्य शेतकरी कापूस या नगदी पिकाकडे वळला आहे. परंतू कापसानेही शेतकऱ्याला दगा दिलाय. जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाने एक ते दीड महिने पाठ फिरवली होती. त्यामुळे कापसाची वाढ खुंटली, यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. लागवडपूर्व मशागत, बियाणे, प्रत्यक्ष लागवड, रासायनिक खते, कीटकनाशके, फवारणी, कोळपणी, निंदणी, कापूस वेचणी या साऱ्यावर शेतकऱ्याला एकरी १८ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु यंदा एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न निघणारा कापूस अवघा एक ते तीन क्विंटलपर्यंत त्याचं उत्पन्न येणार आहे.

बाजारात कापसाला 6 ते 7 हजार प्रतिक्विंटल भाव आहे. शेतकऱ्याला यंदा एकरी फक्त 18 ते 20 हजार रूपये आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. एकणूच शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न झिरो असणार आहे. त्यामुळं दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत आलाय.

शेतीविषयी सरकारी धोरणे आणि शेतीत होणारा तोटा त्यातून शेतकऱ्यांची होणारी गळचेपी यावर जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ येथील अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडलीय. ते म्हणाले की " दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत आलाय. शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपयाचं होतंय नुकसान सहन कराव लागत आहे. शेती नुकसानामुळे शेतकरी कर्जबारी होतं आहे आणि कर्ज फेडण्यासा ठी त्याला शेती विकावी लागत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी अशोक पाटील यांनी दिली आहे. Full View

Tags:    

Similar News