हमीभाव कधी? पपईला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने बागेवर फिरवले ट्रॅक्टर

Update: 2020-12-23 03:28 GMT

औरंगाबाद : उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही मातीमोल भाव मिळत असल्याने पपई उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.तर भाव मिळत नसल्याने औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वडजी येथील शेतकऱ्यांने आपल्या पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

वडजी येथील बाबासाहेब गोजरे यांनी आपल्या दोन एकर शेतात मार्च महिन्यात पपईचे दीड हजार झाडं लावले होते. यासाठी त्यांना खत, फवारणी आणि इतर असे सर्व मिळून 50 हजारांचा खर्च आला होता.अतिवृष्टीमुळे शेतातील इतर पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने पपईमधून तरी केलेला सर्व खर्च भरून निघेल अशी अपेक्षा गोजरे यांना होती. एकट्या पपईच्या बागेतून अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न होईल असा अंदाज त्यांनी बांधला होता.

पण अचानक पपईचे मार्केट पडलं आणि भाव 3-4 रुपये किलोवर आला. आता मिळेल त्या भावाने विकून पैसे मोकळा व्हावा म्हणून गोजरे यांनी अनेक व्यापारांना संपर्क साधला,पण कुणीही शेतात येऊन माल घायला तयार नाही.तर औरंगाबादला जाऊन तीन रुपये किलो पपई विकल्यास वाहतुक खर्चातच आलेले पैसे जाणार असल्याने गोजरे हतबल झाले होते.त्यामुळे अखेर त्यांनी उभ्या बागेत ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पपईची बाग नष्ट केली.

गोजरे यांच्याप्रमाणेच अनेक पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पपईचे झाडं सडले आहे.त्यातून कसेबसे काही बागा वाचल्या असल्या तरीही त्यांना भाव मिळत नाही. राज्यात 13 हजार 800 हेक्टरवर पपईची लागवड केली गेली आहे.पपई नाशवंत पीक असल्याने त्याची साठवणूक करूनही ठेवता येत नाही. त्यामुळे एकतर फुकट भाव विकणे किंवा त्यावर ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.

तर बाजारात केवळ 3-4 रुपये प्रतिकिलो भाव पपईला मिळत असल्याने 'चाराने की मुर्गी बाराने का मसाला' अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.केलेला खर्च सुद्धा निघने अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने पपई उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

Tags:    

Similar News