शेतमाल लिलाव शेड बनले व्यापाऱ्यांचे गोडावून

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (APMC) शेतमाल लिलाव शेड (auction shed) गोडावुन (godown) बनल्याचे चित्र...

Update: 2023-05-08 10:27 GMT

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (APMC) शेतमाल लिलाव शेड (auction shed) गोडावुन (godown) बनल्याचे चित्र दिसून येत आहे.. या शेडमध्ये काही अडते व्यापारी (traders) हे आपला माल साठवून ठेवत असल्याचे सांगण्यात येत असुन यामुळे शेतकऱ्यांच्या विक्रीस येणारा माल उघडयावर टाकण्यात येतो..सध्या पावसाचे वातावरण असून अशात पाऊस आल्यास शेतकऱ्यांचा माल भिजून नुकसान होण्याची भीती आहे. पहा MaxKisan चा स्पेशल रिपोर्ट...

Full View

सध्या पावसाचे वातावरण असून अशात पाऊस आल्यास शेतकऱ्यांचा माल भिजून नुकसान होण्याची भीती आहे.खामगाव बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून याठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातूनही शेतमाल विक्रीसाठी येत असतो. बाजार समिती आवारात शेतमाल लिलावासाठी शेड उभारण्यात आलेले आहेत.मात्र विक्रीसाठी येणारा मोठया प्रमाणावरील माल बघता हे शेड अपुरे ठरत आहेत. अशात यातील काही शेडमध्ये नियमबाह्य पध्दतीने गोडावून प्रमाणे माल साठवून ठेवला जातो. बन्याच शेडमध्ये सध्याही मोठया प्रमाणावर माल साठवून ठेवलेला आहे..काही अडते व्यापारी वेळीच मालाची उचल न करता येथेच थप्पीमारून माल साठवून ठेवतात असे सांगण्यात येते. अनेक दिवस हा माल उचलला जात नाही.. यामुळे आधीच अपुऱ्या असणाऱ्या शेडमध्ये पुन्हा अडचण निर्माण होवून शेतकन्यांचा विक्रीकरीता येणारा शेत माल टाकण्यासाठी जागा उरत नाही.. परीणामी शेडच्या बाहेर उघड्यावर शेतकऱ्यांचा माल टाकला जातो.. सध्या पावसाचे वातावरण असून अवकाळी पाऊस बरसत आहे.. अशा परिस्थितीतही शेतमाल बाहेर टाकूनच लिलाव केल्या जातो..यामुळे अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचा माल भिजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यापूर्वी खामगाव बाजार समितीत अशा घटना घडलेल्या आहेत.. तर बाजार समितीकडून याबाबत अडचण विरुद्ध काही कारवाई करण्यात आली नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Tags:    

Similar News