शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बॅनरच्या माध्यमातून प्रश्न

Update: 2023-08-26 04:30 GMT

येत्या 27 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड मध्ये सभा होणार आहे. आणि या सभेच्या पार्श्भूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच शेतकरी पुत्र धनंजय गुंदेकर यांनी अजित पवारांसमोर सहा प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती प्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध होणार कधी? 2020 चा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कधी? गेल्या वर्षीचे रखडलेले सततचा पाऊस आणि अतिवृष्टी अनुदान मिळणार कधी? जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ होणार कधी? ऊसतोड व बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवणार कधी? आणि बारामतीचे रस्ते चकाचक बीडचे चकाचक होणार कधी? असे सहा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे सहा प्रश्न विचारले गेले असून सध्या धनंजय गुंदेकर हे बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

Full View

Tags:    

Similar News